Tuesday, 20 November, 2007

तू म्हणतेस विसर, पण

तू म्हणतेस विसर, पणसांग तूला मी विसरू कसा?

पाऊस पडेल हिरवाई होईल

सप्तरंगी फुलांची बरसात होईल

तूझ्या आठवणींचा पाऊस हा असासांग तूला मी विसरू कसा?

वैषाख वनव्यात हिरवाई जळेल

तूझ्या आठवणीने हृदय ही पोळेल

तूझ्या विरहाचा वैषाख हा असासांग तूला मी विसरू कसा?

गुलाबी थंडीतील बोचरा वारा

डोळ्यांतून वाहतील आसवांच्या धारा

तूझ्या दूरव्याचा गारवा हा असासांग तूला मी विसरू कसा?

तू म्हणतेस विसर, पण

सांग तूला मी विसरू कसा?

तुझी आठवण...

प्रचंड सळसळ करू लागते.. तुझी आठवण !
पाचोळ्यागत भरू लागते.. तुझी आठवण !

घरट्याभवती गोळा होती पाखरे तशी
मनभर भिरभिर फिरू लागते.. तुझी आठवण !

सापडल्यावर कवितांची कधि जुनी वही
पुन्हा नव्याने झरू लागते.. तुझी आठवण !

पापणीतल्या पाण्यावरती कधी अचानक
हलते आणिक विरू लागते.. तुझी आठवण !

चालत चालत दूर दूर मी जातो तरिही
उरी खोलवर उरू लागते.. तुझी आठवण !

विसरायास्तव तुला पुस्तके वाचत बसतो,
'अभंग' बनुनी तरू लागते.. तुझी आठवण !

कधी एकट्या सायंकाळी निवांत बसता
अवघे अंतर चिरू लागते.. तुझी आठवण !

मीच ...

मीच दाटेन डोळ्यांत मेघ काळासा होऊन,
मग आसवांचे पूर कसे थोपशील तू ?
मीच असेन नभात चंद्र बिलोर होऊन,
तेव्हा रातभर सखे कशी झोपशील तू ?

सूर माझेच गातील जेव्हा पाखरे रानात,
धून माझ्या बासरीची तुझ्या येईल कानात,
मग अनामिक ओढ जागू लागेल पायांत,
वेड्या पावलांना सखे कशी रोखशील तू ?

दूर जाशीलच किती सांग जाऊन जाऊन,
रोमारोमावर तुझ्या आता माझी स्पर्शखूण,
बघ मिटून पापण्या मीच तिथेही दिसेन,
आता तूच सांग सखे कुठे लपशील तू ?

तुझ्यात मी

मी तुझ्या भवतीच आहे
सळसळतो वाऱ्यातून
मी तुला बघतोच आहे
लुकलुकत्या ताऱ्यांतून!

का कळेना हे तुला मी
या फुलांतून हासतो?
वाहणाऱ्या निर्झरातून
कधीच का ना भासतो?

मी सदाचा गात असतो
मी खगांची शीळ गं
बरसतो तव अंगणातून
मीच तो घननीळ गं!

होशी तू बेधुंद ज्याने
तोच तो मृद्गंध मी
नित्य जे तव ओठी येते
त्या गीताचा छंद मी!

आज वेडे का तरीही
एकटे तुज वाटते?
मी तुझ्या असण्यात असुनी
दुःख हृदयी दाटते?

स्पर्शू दे की कोमल ओठांना

स्पर्शू दे की कोमल ओठांना
दुसरे न काही, हा प्याला असे
देवाकडुनी सुंदर सर्वांहुनी
पुरस्कार मज हा मिळाला असे ।ध्रु।

लाजेने वाया ना जावे
क्षण यौवनाचे रंगीत हे
धडधडत्या अनतंत्र हृदयांतुनी
संदेश प्रीतीचा आला असे ।१।

उडवावे भल्यावर शिंतोडे
ही खोड आहे जगाची जुनी
प्याल्याला ह्या मान सद्भाग्य तू
दुष्कीर्त जरि तो झाला असे ।२।

बायको

अशी आपली बायको असावी - हजार जणींत उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र, त्याची मिजास नसावी

अशी आपली बायको - भक्कम पगाराची,कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र, ती मला घरीच दिसावी

अशी आपली बायको - चतुर, शहाणी,अभिमानी असावी
नम्रपणे माझ्यापुढे मात्र, मान तिची खाली असावी

अशी आपली बायको - सभेत धीट, कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरीदारी मात्र, ती गरीब गाय असावी

अशी आपली बायको - बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र, तिला कधी आठवण नसावी

अशी आपली बायको - प्रसन्न, सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र, तिच्या भाळी आठी नसावी

अशी आपली बायको - शांत गंभीर, पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र, तिची काही प्रतिक्रिया नसावी

अशी आपली बायको - व्यवहारी, काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र, तिची कधी टीका नसावी

अशी आपली बायको - एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र, तिची काही तक्रार नसावी

अशी आपली बायको - सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र, मुलाबाळांवर सावली नसावी

अशी आपली बायको असावी - माझ्यापलिकडे तिची दृष्टी नसावी
मी खिडकीबाहेर बघण्याला मात्र, तिची कधी हरकत नसावी !

प्रेमपत्र पहिले लिहिताना...

प्रेमपत्र पहिले लिहिताना वेळ लागतो
नवीन पक्ष्याला उडताना वेळ लागतो...

'मिठीत' नव्हते, 'मनात' होते शिरायचे मज
अंतर मधले ओळखताना वेळ लागतो...

धागा अथवा नाते जर गाठीत अडकले;
प्रयत्न केले तरी सुटताना वेळ लागतो...

उपाय आता सापडला या जखमांवर पण
घाव खोलवरचे भरताना वेळ लागतो...

प्रीत!

शांत सारा परिसर
शिरशिर पाण्यावर
कमलीनी झाली दंग
कवेमध्ये घेई भृंग...

काठोकाठ भरे घट
अमृतात न्हाती ओठ
अनावर बाहूपाशी
ओसंडून वाहे काठ...

वारियाच्या तालावर
देठ मंद हले डुले
आत द्वैताची अद्वैती
प्रीत चिरंतन जुळे...

Tuesday, 13 November, 2007

एक कविता लिहीन म्हणतो,

एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..
काळजाचा ठाव घेत मनामनाला भावणारी..

रणरणत्या सिग्नलपाशी
थांबलेलं एक बालपण..
घासासाठी कोरभर करतं रोज वणवण..
इवलीशी पावलं.. रस्ताभर चटके..
चार आण्यांचा फुटला कप,
त्याला बारा आण्यांचे फटके..
नावामागे लावायला बापाचंही नाव नाही,
पाटी नाही, शाळा नाही, अक्षरांचा गाव नाही.
पोट भरायला शिकताना राहून जातं शिकणं,
भाळी येतं धक्के खाणं आणि पेपर विकणं..
हव्याहव्याशा सुखांचा जमत नाही थाट..
काही कळण्याआधीच लेकरू चुकतं वाट.
त्याला पडताना सावरणारी,
तो चुकला की कावणारी..
आयुष्याचा ध्रुव होऊन त्याला दिशा दावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

माथ्यावरती अठराविश्वे दारिद्र्याचा शाप..
कितीही गाळला घाम तरी भरत नाही माप.
कर्जाची जू ओढत उपसत बसतो कष्ट..
सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट.
पोराचं शिक्षण.. पोरींची लग्नं..
घरदार पडलं गहाण, दुष्काळाचं विघ्न...
आभाळभर दाटतात मग हे विषारी प्रश्न.
कुठून आणावं आता सुख मागून उसनं?
जड जायला लागतो रोज ताटातला घास..
पिंपळाशी वाट बघतो.. लोंबणारा फास.
परिस्थितीच्या वादळात
जिद्दीचं पीक लावणारी..

"पोलीसी खाक्या"!१

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.

जलद गाडी (फास्ट ट्रेन) असल्यामुळे अंधेरी-वांद्रे,वांद्रे-दादर आणि दादर-मुंबई सेंट्रल ह्या दरम्यानच्या स्थानकांवर ती थांबणार नव्हती त्यामुळे आता अंधेरीहून गाडी सुटल्यावर तरी निदान पुढचे स्थानक(स्टेशन) येईपर्यंत गर्दी वाढणार नव्हती. भर उन्हाळ्याचे दिवस,त्यात काही पंखे बंद म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना असा प्रकार होता. भरमसाठ गर्दीने आणि उकाड्यामुळे घामाने भिजलेली अंगं,त्यात पाशिंजरांच्या आपापसातील बडबडीमुळे होणारा कलकलाट आणि गाडी वेगात धावत असल्यामुळे होणारा खडखडाट ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मला झोप येत होती. मी उभ्या उभ्या पेंगायलाही लागलो. एक-दोन वेळा मानही लुढकली पण पुन्हा मी मोठ्या निर्धाराने झोपेचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करू लागलो.

ह्या सगळ्या प्रकारात वांद्रे स्थानक आले केव्हा तेच कळले नाही पण वांद्र्याकडून गाडी जेव्हा माहीमच्या दिशेला निघाली तेव्हा त्या खाडीच्या थंडगार वार्‍याने मी जागा झालो. वांद्र्याला गाडी थोडी रिकामी झाल्याचे जाणवले आणि हात खाली करून कोणताही आधार न घेता उभे राहाता येईल अशी परिस्थिती असल्यामुळे मी कड्या सोडल्या आणि हात खाली केले. हातांचा स्पर्श पँटच्या खिशांना झाला आणि मी ताडकन उडालो. ज्या खिश्यात पास-पाकीट होते तो चक्क सपाट लागत होता. मी खिशात हात घालून पाहिले आणि माझ्या सगळा प्रकार लक्षात आला. माझे पाकीट त्या गर्दीत मारले गेले होते. त्यात नुकताच काढलेला तीन महिन्यांचा रेल्वेचा पास, माझे ऑफीसचे ओळखपत्र आणि काही किरकोळ रक्कम त्यात होती. पास पुन्हा काढता येत होता पण मला चिंता होती ती त्या ओळख पत्राची.कारण मी ज्या केंद्र सरकारी कार्यालयात काम करत होतो ते जरा विचित्र खाते होते. धड ना पोलीस ना नागरी. पोलिसांसारखे आम्ही २४ तास बांधील होतो पण आम्हाला गणवेश नव्हता. पोलीसांसारखे अधिकारही नव्हते पण सेवाशर्ती सगळ्या पोलिसांसारख्या. म्हणजे शिस्तीला एकदम कडक आणि अधिकार काहीच नाही. म्हणजे आमची अवस्था वटवाघळासारखी अधांतरी! ओळखपत्र हरवले म्हणजे आता चौकशीला सामोरे जावे लागणार, कानपिचक्या,दंड आणि रेकॉर्ड खराब होणार. मग आता काय करायचे?तर दादरला उतरून रेल्वे पोलीसात तक्रार करणे इतकेच माझ्या हातात होते.

मी दादरला उतरलो. रेल्वे पोलीस चौकी शोधून काढली आणि माझी तक्रार सांगितली. माझे पाकीट कुठे मारले गेले ? तर अंधेरी ते वांद्रे ह्या दरम्यान. हे त्यांनी माझ्याच तोंडून वदवून घेतले आणि आपले हात वर केले. म्हणाले की ही केस वांद्रे रेपोंची आहे तेव्हा तुम्ही तिथे जा. मग काय मी तसाच वांद्र्याला पोचलो. ह्या सर्व धांदलीत आता आपल्याकडे पास किंवा तिकीट नाही हे देखिल लक्षात आले नाही.पण सुदैवाने कुणी अडवले नाही. वांद्र्याच्या त्या पोचौ मध्ये मी पोचलो तेव्हा तिथे दोन पोलीस बसले होते. दोघे आमने सामने बसले होते. त्यातला एक जमादार(एक तारा) फोनवर कुणाशी तरी गप्पा मारत होता आणि दुसरा हवालदार त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसून अगदी मन लावून कान कोरत होता. माझ्या तिथल्या आगमनाची जरादेखिल जाणीव त्यांना झाल्याचे दिसले नाही. मी आपला त्यांचे माझ्याकडे कधी लक्ष जाते ह्याची वाट पाहात चुळबुळ करत उभा होतो पण रामा शिवा गोविंदा. दोघेही आपल्याच तारेत होते. शेवटी एकदाचे त्या जमादाराचे फोनवरचे बोलणे संपले आणि आता तो आपल्याकडे नक्की पाहील आणि विचारेल... वगैरे वगैरे विचार मी केला पण पुढे काहीच घडले नाही. त्या जमादाराने हवालदाराशी बोलणे सुरु केले.
"बरं का वाघमार्‍या,तिच्या आयला........ ह्या मा**** साहेबाच्या ***बांबू सारला पाहिजे. फुकटचोट भे** तरास देतोय."
"सायेब.तुमाला काय सांगू? ते म्हनजे बगा एकदम बारा बोड्याचं बेनं हाय.लय मा**** बगा.त्येच्या फुडं नुस्तं हांजी हांजी म्हनायचं. अवो धा वर्सं काडलीत त्येच्या संगट.लई हरामी जात हाय. तुमी त्येच्या नादी लागू नका.... वगैरे वगैरे वगैरे"!
त्यांचे ते बोलणे असे सुरुच राहिले असते म्हणून त्यात व्यत्यय आणण्यासाठी मी जोरात खाकरलो आणि मग नाईलाजाने त्यांना माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली.

"पोलीसी खाक्या"!२

"हां! बोला. काय काम हाय?" एक तारा.
"साहेब, त्याचं काय आहे की माझं पाकीट उडवलं"! मी
"उडवलं? ते कस काय बुवा? "
"आता ते मला कळलं असतं तर मी इथे कशाला आलो असतो?" मी. मी देखिल तिरकस बोलण्यात कमी नव्हतो. इथे आपला हात दगडाखाली आहे हे माहीत असल्यामुळे त्यातल्या त्यात सौम्य भाषेत बोललो.
"बरं का वाघमार्‍या,ह्ये सायेब बग काय म्हनताहेत. त्येंचं पाकीट उडवलं तरी बी त्यांना काहीच कळालं न्हाय". एकतारा.
एकतार्‍याच्या बोलण्याने आता वाघमार्‍या मैदानात आला.
" बरं सायेब मला सांगा तुमी ते पाकीट काय असे दोन बोटात धरून उंच धरले व्हते की काय? म्हंजी आसं बगा की ह्ये पाकीट हाय आनि ह्ये मी आसं धरलंय उंच(वाघमार्‍या अगदी प्रात्यक्षिक करून दाखवत होता) आनि तुमी त्या पाकीटमारांला आवतन देत व्हता काय की या,उडवा माजं पाकीट?" वाघमार्‍या. आणि दोघे खो-खो हसत सुटले.
"काय तिच्या आयला लोक बी कंप्लेंटी आनत्यात? पाकीट उडवले म्हनं?" एकतारा.
"बरं माला सांगा,पाकीट उडवला तवा तुमी काय करत व्हता? न्हाय म्हन्जे बसला व्हता,उबा व्हता? नक्की काय करत व्हता?" वाघमार्‍या.
"अहो गर्दी चिक्कार होती गाडीला....
मी माझे वाक्य पूर्ण करण्याच्या आधीच दोघे ठो ठो हसू लागले.
" आरं तेच्या मायला,वाघमार्‍या! सायेब काय म्हन्तायेत की गाडीला लय गर्दी व्हती. आता मुंबैच्या गाडीत गर्दी आसनार न्हाय तर मग कुटं आसनार? मुंबैत नवीनच दिसतंय बेनं! भटाचं दिसतंय ! भासा बग कसी एकदम सुद्द वापर्तोय". एकतारा.
"ओ साहेब शिव्या द्यायचं काय काम नाही सांगून ठेवतोय आणि माझी जात काढायची तर अजिबात जरूर नाही. मीही बक्कळ शिव्या देऊ शकतो. उगीच माझे तोंड उघडायला लावू नका". मीही चिडून बोललो.
"च्यामारी वाघमार्‍या! हिथं पोलीस कोन हाय? आपून की ह्ये बेनं? च्यायला हाय तर किडूक-मिडूक. पर आपल्याला दम देतोय. घे रे ह्याला आत आन दाव आपला इंगा". एकतारा.
"ओ,हात लावायचे काय काम नाही सांगून ठेवतो. उगीच पस्तावाल". आता माझाही संयम संपत चालला होता. ते दोघे माझ्याकडे एक टाईमपास म्हणून बघत होते आणि स्वतःची करमणूक करून घेत होते. माझा आवाजही आता तापला होता आणि आजूबाजूची फलाटावरची दोनचार पासिंजर मंडळीही ही करमणूक बघायला आतमध्ये डोकावली.
माझ्या आव्हानाने वाघमार्‍या चवताळला. पटकन उठला आणि माझा दंड त्याच्या राकट हातांनी धरायला म्हणून पुढे सरसावला. पण मी सावध होतो. चपळाईने दूर झालो आणि वाघमार्‍याचा तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. जणू मला तो साष्टांग नमस्कार करत होता कारण त्या अवस्थेतही त्याने त्याचे हात मला पकडण्यासाठी लांब केले होते.
आता गप्प बसून चालणार नाही हे मी ताडले आणि माझा हुकुमाचा एक्का काढला. खरे तर मी एक सामान्य नागरिक म्हणून जगू इच्छित होतो पण ह्या दोघा टोणग्यांनी मला माझे खरे स्वरूप उघड करायची वेळ आणली होती जे मी स्वतःहून करू इच्छित नव्हतो.
"अतिरिक्त आयुक्त,विशेष शाखा(ऍडिशनल कमिशनर स्पेशल ब्रँच) श्रीयुत अमूक अमूक ह्यांच्या ऑफिसात मी काम करतोय. मला जायला उशीर होतोय. ते तिकडे माझी वाट पाहत आहेत आणि मला तुमच्यामुळे हा उशीर होतोय. वर मला मानसिक त्रास तुम्ही जो देताय हे सगळे त्यांना कळले ना तर माझ्याऐवजी तुम्हीच आत जाल. तेव्हा मुकाट्याने माझी तक्रार नोंदवून घ्या आणि मला त्याची पोचपावती द्या. नाहीतर पुढच्या परिणामांना तयार व्हा". माझ्या ह्या खणखणीत बोलण्याने दोघेही हतबुद्ध होऊन माझ्याकडे पाहतच राहिले.

अत्यंत कृश शरीरयष्टी(अगदी क्रिकेटच्या यष्टीसारखी),मध्यम उंची,पट्ट्यापट्ट्याचा टी शर्ट,खाली भडक रंगाची पँट,केस अस्ताव्यस्त, हनुवटीखालची बोकडदाढी आणि हातात ब्रीफकेस असा माझा त्यावेळचा अवतार हा कोणत्याही अशा तर्‍हेच्या पोलीसी खात्याला शोभणारा मुळीच नव्हता त्यामुळे त्या दोघांना कळेना की नक्की काय प्रकार असावा ते. हा म्हणतोय ते खरे असेल तर आपले काही खरे नाही पण हा उगीचच दमबाजी करत असेल तर? अशा पेचात ते दोघे सापडले असतानाच एक सब इन्स्पेक्टर आत आला. त्याच्या आगमनाने त्या दोघांना हायसे वाटले असावे असे त्यांच्या चेहर्‍यावरच्या हावभावावरून वाटले. त्या दोघांनी सइला एक कडक सलाम ठोकला. सइ खुर्चीत स्थानापन्न झाला आणि त्याने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिले. ही संधी साधून मी माझी खरी ओळख दिली आणि तक्रार घडाघडा सांगून टाकली.
माझ्या साहेबांचे नाव ऐकले मात्र सइची पण कळी खुलली . हे साहेब मुळातले मुंबई पोलिसातलेच होते.पण आमच्या कडे पाहुणे कलाकार म्हणून(डेप्युटेशनवर) आले होते. राष्ट्रपती पदक विजेते आणि अतिशय कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष म्हणून त्यांचा लौकिक होता.सइदेखिल त्यांचा लौकिक जाणून होता.

लगेच मला बसायला खुर्ची दिली गेली आणि वाघमार्‍याला चहा आणायला पिटाळले. एकतारा आता खाली मान घालून उभा होता. आता आपले काही खरे नाही असेच भाव त्याच्या चेहर्‍यावर होते कारण आतापर्यंत झालेला प्रसंग मी सइला सविस्तर सांगितला. त्याने त्या दोघांना असे काही झापले की त्यांची ती दयनीय अवस्था पाहून मलाच वाईट वाटले.पण त्या माजोरड्यांना त्यांच्या भाषेत डोस मिळणे अत्यावश्यक होतेच. त्यानंतर विद्युत वेगाने हालचाली झाल्या. माझी तक्रार नोंदवून त्याची पोचपावती दिली गेली. स्पेशल चहा आलाच होता. तो पिऊन मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो.

एकतारा आणि वाघमार्‍यांनी माझ्याकडे दयेची याचना केली.
"सायेब, गलती जाली. एक डाव माप करा. आमी वळकलं न्हाय तुमाला. आता मोट्या सायबांस्नी काय सांगू नकासा. न्हाईतर आमची नोकरी जाईल. तुमी आदीच सांगतल आस्तं तर आसं जालं नसत. पुन्यांदा आसं न्हाय व्हनार. आयच्यान!" एकतारा
"बाबांनो, तुमी पोलीस लोक सामान्य माणसाशी कसे वागता हेच मला बघायचे होते आणि मी जर सामान्यच आहे असे सिद्ध झाले असते तर तुम्ही माझे काय हाल केले असते ह्याची कल्पनाच करवत नाही. तेव्हा एक अनुभव म्हणून मी हे साहेबांना सांगणार आहे हे नक्की".
माझ्या त्या बोलण्यावर दोघे माझ्या पाया पडायला लागले आणि मग जास्त तमाशा नको म्हणून मी त्यांना माफ करून साहेबांकडे त्यांची तक्रार करणार नाही असे वचन दिले.

आज मी जर एक सामान्य नागरिक असतो तर माझे काय झाले असते?

समाप्त!

कुसुम्बी...

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घन गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी ।
शिडकाव संथ होता झाडे निळी कुसुम्बी ।।

तळपायावर मेंदी ओली

अनघड कुठल्या गाण्यामधली ।
मंद्र मदालस तिच्या निळ्या डोळ्यांत उतरली
लाल पाखरे नभाळ्यातली ।।
थिरक बिथरली ती स्वर ओली

पैजणातली हळवी बोली ।

तळपायावर मेंदी ओली

अन् भिंतीवरला रंग अबोली ।।

Kagadanchi Phule

Image Hosting

Party

Image Hosting

Thursday, 8 November, 2007

सखे, तुझ्या दग्याचा "एक रुपया"

सखे, कुठं मी चुकलो, कशास मुकलो
रोज याचा हिशोब मी करायला बसतो
सगळी देणी-घेणी अगदी अचुक मांडतो
पण सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, प्रेमाची वा मैत्रीची
मी कधीच कींमत करत नाही
पण तुझ्या दग्याची
मात्र मी कींमत करतो
सखे तुझ्या दग्याला
मी फ़क्त एका रुपयातच मोजतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे जाताना तु मला
व्यवहारी जग दाखवुन गेलीस
त्याच व्यवहारी जगात आज
मी लाखोंची उलाढाल करतो
सखे, या दुनियेतला प्रत्येकजण मला
आज या पैश्यामुळेच सलाम ठोकतो
पण सखे, हा एक रुपया माझ्या
राज्याच्या हुद्दयाला रंक ठरवतो
मी जिंकलेल्या युध्दालाही
ह रुपयाचा एक अंक हरवतो

सखे, या रुपयाला ना
बाहेर कुणीच विचारत नाही
पण माझ्यासमोर मात्र
ताठ मानेने जगतो
सखे, लहानपणी मी गणितात
शिष्यव्रुत्तीने पास व्हायचो
पण या बेरीज-वजाबाकीच्या साध्या
गणितात आज मात्र मी नापास होतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, मला कधी कधी तुझी आठवण येते
तेव्हा मी या रुपयाकडे नजर रोखुन पाहतो
त्यातला तो एक आकडा
ना मला सारखा खुणावतो
की तु एकटाच आहेस, आणि एकटाच राहणार
सखे, माझ्या डोळ्यांतुन ओघळणारा थेंब मग
त्या रुपयावर हलकेच विसावतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, माझा मित्रानं
मला एकदा विचारलेल
की "अरे तु आज ईतका
श्रीमंत तरी हा फ़ुटकळ
एक रुपया तुझ्याजवळ का असतो?"
सखे मी त्याला म्हणालो
"अरे हा "भाग्याचा" रुपया आहे
म्हणुन याला मी नेहमी खिशात ठेवतो"
आणि हो "हा फ़क्त ज्याच्या नशिबात आहे
त्यालाच मिळतो" फ़क्त त्यालाच मिळतो....

कविता सुचते...

सहजच लिहिता-लिहिता कविता सुचते
स्वप्ने बघता-बघता कविता सुचते...

आयुष्यावर प्रेम करीत जगावे
मजेत जगता-जगता कविता सुचते...

चांदण्यातली रात्र जागल्यानंतर
पहाट खुलता-खुलता कविता सुचते...

आठवणींनी डोळे भरून येती
डोळे टिपता-टिपता कविता सुचते...

प्रेम व्यक्त करणे तर अवघड जाते!
कबूल करता-करता कविता सुचते...

सततच बोलत असतो मी माझ्याशी
स्वतःत रमता-रमता कविता सुचते...

प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!

इंटरनेटवरुन साभार .............. [म्हंजे मागून problem नको ]

प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!

दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,

स्वप्नात सुध्धा आपल्या तिच व्यापुन उरणार

येता जाता उठता बसता,

फक्त तिचीच आठवण होणार

तुमच काय, माझं काय,

प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!

डोळ्यात तिच्या आपल्याला स्वप्नं नवी दिसणार,

तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चांदणे सांडणार,

ऐश्वर्याचा चेहरा सुध्धा मग:

तिच्यापुढे फिका वाटणार

तुमच काय, माझं काय,

प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!

तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार,

मित्रांसमोर मात्र बेफिकीरी दाखवणार

न राहवुन शेवटी आपणच फोन लावनार

तुमच काय, माझं काय,

प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!

Messages नि तिच्या Inbox आपला भरुन जाणार,

तिचा साधा Message पण आपण जपुन ठेवणार

प्रत्येक Senti Message पहिला तिलाच Forward होणार,

तुमच काय, माझं काय,

प्रेमात पडलं की असच होणार ........... !!!

ती कोण होती कुणास ठाऊक....

ती कोण होती कुणास ठाऊक, पण

ती दिसली मात्र क्षणभरच होती...

ती कोण होती कुणास ठाऊक, पण

ती स्वप्नात मात्र माझ्या आली होती..

ती कोण होती कुणास ठाऊक, पण

ती हसत मात्र तुझ्यासारखीच होती..

ती कोण होती कुणास ठाऊक, पण

ती दिसत मात्र तुझ्यासारखीच होती....!!!!

सखी स्वस्त झाल्या खारका...

सखी स्वस्त झाल्या खारका, आता तरी घेशील का?

साखरी खारीक देखणी, वाटली जरी थोडी जूनी
हा लॉट अंतीम राहिला, त्यास योग्य किम्मत देशील का?

तागड्यात आहे वजनही अनं खिशात सुट्टे पैसे ही
हा सुकामेवा खाणारा, ग्राहक तू होशील का?

जे जे हवे होते किचनी, आहे ते सारे लाभले
या खारका बरणीत भरूनी, किचन ला शोभा देशील का?

बोलाविल्यावाचूनी विक्रेता हा, आलो मी दारी तुझ्या
थांबेन इथे काही प्रहर पण सांग तू नक्की घेशील का?

सखी स्वस्त झाल्या खारका, आता तरी घेशील का?


बाथरूमची महती...

घामटलेली, पारोसी आणि अस्वच्छ अशी शरीरं...
जिथे न्हाऊन चारचौघात बसण्याच्या लायक होतात,
आणि एरवी कघी एक शब्ददेखिल न गुणगुणणारे...
जिथे जाऊन तारस्वरात गाणारे पट्टीचे गायक होतात,
अशा त्या सुंदर छोट्याशा रूमची, व्वाह काय बात आहे!
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!!

"युरेक्क्क्क्क्का" असे शस्त्रज्ञ तिथेचं का ओरडला??
कारण ती डिस्कव्हरी अजून कुठेही फिट होत नाही,
आणि बाथरूम मधील सेक्सी सीन किंवा गाण्याशिवाय...
सिनेतारका बॉक्स-ऑफीसावर रातोरात हिट होत नाही,
विज्ञानापासून मनोरंजनापर्यंत, सर्वांनाच त्याची साथ आहे...
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!

तुम्ही म्हणाल "काय बाथरूम-बाथरूम लावलंय??"
पण एक उदाहरण देतो म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पटेल,
लिविंग किंव्वा बेडरूम मध्ये दाढी करत बसलेला नवरा...
तुमच्यापैकी किती बायकांना हो हवा-हवासा वाटेल?,
तुमचं नातं कसं मजबूत करावं, हे ही त्याला ज्ञात आहे...
कान देउनी ऐका दोस्तहो, मी बाथरूमची महती गात आहे!

मना सज्जना!--कौल सेंटर्च्या व्यथा! ;)

मना सज्जना - जर भिकारवाचे ऐकावे!
सदा call-centerवर मधुर बोलावे!
कितीदा व्य्तयये घोष्णा येती ठणाणा!
तरी सोडीजे शांत-व्रुत्ती मना ना!

विरक्तमुखे बोलती सर्व पाहा हे!
मरे रोज (ग्राहक!) कोण शोक वाहे!
मधाच्या वाहती वाणीत गोणी!
वरोनी फुकट बक्षिसाचे स्वप्न- लोणी!

कितादा कराव्या याचना त्या दीनवाण्या!
परी वाचाळ चांडाळ कानी घेईना!
आवाजात सुतक े का डोकावते?
की आपुले भविष्य ते भासते??

स्वैर जेव्हा होते आकाशवाणी!
सुरू करावी आपुली शिमगावाणी!
खम्क्याप्र्माणे त्या वाचाळा पुसावे!
"काय म्हणोनी हे network" वापरावे?"

"भिकार्याप्रमाणे काय हे वागवणे?
पैसे घेउन वरी असे लुबाडणे?"
थांब सांग नाव-प्त्ता जरा तो,
असा आता ग्राहक-मंची जातो!"

दाखवीता जरा तिस्रे नेत्र असे हे!
क्शाणार्धात चाटती कसे पाय हे!
दुकानात जावे - पुन्हा ध्मकवावे!
तेव्हा येती साहेब स्वागता हेे!

"जराशी चूक झालीच आहे!
उगीच का राग धरणे म्ना हे!"
अशा श्ब्दे "संत" सम्जावती!
सावध मना!
काम झाल्याची ही नसेे पावती!

पुन्हा एकदा जरा गुरगुरणे!
वरोनी जरा सौम्यभावे बोलणे!
"प्रेमानेच आपुल्या एवढे बोलतो आहे!"
(या क्र्मांकावर अजून बरेच काम आहे!)

निस्र्गचक्र हे न चुके ते कुणाला!
शेवटच्या बिलात लावणे चंदन कंपनीला!
पत्रे आणीक माणसे येता घराला!
प्रकुर्तीसाठी जाणे मूळ गावाला!

हजाराचा तरी चुना प्रेम भावे लावावा!
मना अशा स्व्प्नी पुन्हा "मदत-क्र्मांक" फिरवावा!!

श्री वाचाळ-सम्र्थ !!

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express