Thursday, 20 March 2008

हीच ती अप्सरा…

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

भरऊन्हात चांदणी ही कोठुन आली,
गंध यौवनाचे उधळे ही भोवताली….

हे रुप-वादळाचे नवे रंग कुठले…?
पाखरु मनाचे शोधीती आसरा…..

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

फुलल्या कळीचा हा दर्वळे सुवास
हृदय बावरे का? अधीरलेत श्वास…

हे मुके गीत ओठातुनी कैसे निघाले?
हरविले सुर सारे, भुललो मी अक्षरा…….

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

Thursday, 21 February 2008

PU LA

Thursday, 3 January 2008

1 जानेवारी ची संध्याकाळ

नेहमी प्रमाणे संध्याकाळी मी ऑफिस मधुन घरी जात होतो. लोकल मध्ये जास्त गर्दी नव्हती.
एक भिकारी आणि त्याची बायको भिक मागत होते. खटकण्याची गोष्ट म्हणजे तो भिकारी casio चा पियानो घेउन भिक मागत होता

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express