Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Wednesday, 24 January 2007

अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

आयुष्य असंच जगायचं असतं!

जे घडेल ते सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

कुठून सुरू झालं हे माहीत नसलं,
तरी कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

कुणासाठी काहीतरी निस्वार्थीपणे करायचं असतं,
स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखावायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

दु:ख आणि अश्रूंना मनांत कोंडून ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं मात्र असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

पंखांमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी,
'मागून मागून काय मागितलंस', असंच म्हणायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

Thursday, 11 January 2007

ओठांवर आलेले शब्द

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

मी बोलतच नाही

डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....

तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...

स्तब्ध होऊन

तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...

क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं

पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो

बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही

बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं

सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही

माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं

तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?

तिच्याही एखाद्या पुस्तकात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील ...

Monday, 8 January 2007

एकदा

एकदा मला भेटायला
माझ्या घरी येशील
आणि केस मोकळे सोडून
माझ्या जवळ बसशील

मी दोन्ही हातांमधे
तुझा चेहरा घेईन
रेखीव गहिऱ्या डोळ्यांमधे
बघून हरवून जाईन

तू विचार माझा राज़ा
असं काय बघतो?
मी म्हणेन बघतो कुठे?
पावसात भिजतो

मग तू अलगद, तुझा रेखीव
पापण्या मिटून घेशील
पाऊस ओसरल्यावरचं
निरभ्र आकाश होशील

मग विचार किती वाजले?
वेळ झाली का?
मी म्हणेन हे ग काय राणी
मग तू आलीसच का?

मला जवळ घेऊन
माझी समजून घाल
म्हण राजा सोडून जाताना
माझेही होतात हाल

मग मी तुला पुन्हा एकदा
डोळ्यात साठवून घेईन
आणि एकदम शहाण्यासारखा
तुला जाऊ देईन

काहीच कळत नाही

बोलावं वाटतं खूप पण... जीभच वळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मन झालंय वादळवारं.. तूफान मनात दाटलंय सारं


आवेगाचा पाऊस जसा... कोसळत जातो धुवाधार

बरसावं वाटतं तसंच पण... शब्दच फळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

स्वतःशीच हसणं होतं... स्वतःशीच बोलणं होतं

कुणी काही म्हटलं तरी... मन मुकं मुकं होतं

ज्यांच्यावाचून नव्हतं करमत.. त्यांच्याशीही जुळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

तुझीच आस, तुझीच ओढ... काहीच नाही वाटत

गोडकानी गुंजते तुझीच शीळ... जीव तुटतो तीळ तीळ

छळायचा जो एकांत आता.. तो ही छळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मुकी मुकी जरी वाणी... मनी मात्र फुलती गाणी

आटपाट नामे नगरीचा.. तू राजा, मी राणी

सारं तसं खोटं खोटंच... पण मनास वळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मागू नकोस

मागू नकोस रे तू

आपण जगलेले ते बेभान क्षण

जरा कुरवाळू दे ना मला

ती विलक्षण आठवण

धुंद पावसातली ती

ओली गच्च संध्याकाळ

एकाच छत्रीतून केलेलीती नशीली वाटचाल

त्या मुसळधार पावसाच्याबेफाम सरी

अन तुझ्या सहवासाचीती गोड शिरशिरी

सारं कसं भारलेलंमंत्रमुग्ध झालेलं

मौनानंच जणूसारं काही बोललेलं

माझ्या मनात कायमचासाठवू दे रे

तुलादृष्टीआड होण्या आधी

सारं पुन्हा जगू दे रे मला

एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर

काळ्या ठक्कर अंधारातून आली तेजस्वी किनार
नजरेतुन नजर झाली आरपार

हजारो लाखो असतील तुझ्या मागे पुढे
कदाचित तुझ्या लेखी असो आम्ही त्यातलेच एक बाजीराव फाकडे

खऱ्या खोट्या प्रेमाची जाण फक्त तुलाच आहे..
म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही म्हणणारा हा पठठया तुझ्यापुढे नमायला तयार आहे

माहितेय ...माहितेय... सगळचं आपल्या मनासारखं घडावं असं नसतं काही
पण भावना पोचल्या तुझ्यापर्यंत आणि एक स्मितहास्य आलं....

तर समजेन एका क्षणापुरतं तरी माझ्या प्रेमाला दाद दिली.. !!!
आणि मी यातचं सारं आयुष्य सामावून बसेल....

त्या एका क्षणाला मी ब्रम्हदेवाचा क्षण समजतो..
कारण त्यामुळेच सात जन्म मी तुझं प्रेम मिळवू शकतो

म्हणूनच एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर

प्रिया

नकळत उमले हसू ओठावर

मनी तिचा तो अल्लड वावर

आठवणींची भरली ओंजळ

अंतरातूनी पसरे दरवळ

रंग केतकी, जिवणी नाजूक

गालांवरचे गुलाब मोहक

महिरप कुरळ्या केसांची

अन्भाळावरची बट ती कामुक

भाव मनीचे नेत्र सांगती

शब्दाविण ते बोलून जाती

तार दिलाची छेडून जाती

संमोहन ते पसरुन जाती

सौंदर्यखणी ती, मदनमंजिरी

वेड लाविते नजर लाजरी

उत्कट खुलते प्रीत बावरी

माझी प्रिया ही गोड गोजिरी

Sunday, 7 January 2007

उचकी

जेव्हा उचकी लागते तेव्हा

कोणीतरी आपलं माणूस म्हणे

आपली आठवण काढत असते

हे खरं की खोटं, देव जाणे...

एक मात्र नक्कीच खरं

मला उचकी लागते तेव्हा

आठवण फक्त तुझीच येत असते...


Friday, 5 January 2007

प्रेम म्हणजे काय...

प्रेम म्हणजे काय...

मनाला उल्हसित करून टाकणारी

हवेची मंद झुळूक....

हृदयाला सुखावणारी एक भावना......

प्रेम म्हणजे मनांचा संगम....

एकमेकांबदद्लची आत्मीयता...

आयुष्यात कोणीतरी पाहिजे ,

प्रत्येक वळणावर साथ द्यायला...

"वो सिकंदर ही दोस्तों कहलता है,

हारी बाजी को जितना जिसे आता है..."

असे म्हणत आपल्याबरोबर असणारे

कोणीतरी हवे......

कधी आई-वडील, कधी भाऊ-बहीण

तर कधी मित्र-मैत्रीण...

कोणी-ना-कोणी असतेच आपल्याला साद देणारे

फक्त गरज आहे हाकेला 'ओ' देण्याची......!

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express