Thursday, 8 November, 2007

कविता सुचते...

सहजच लिहिता-लिहिता कविता सुचते
स्वप्ने बघता-बघता कविता सुचते...

आयुष्यावर प्रेम करीत जगावे
मजेत जगता-जगता कविता सुचते...

चांदण्यातली रात्र जागल्यानंतर
पहाट खुलता-खुलता कविता सुचते...

आठवणींनी डोळे भरून येती
डोळे टिपता-टिपता कविता सुचते...

प्रेम व्यक्त करणे तर अवघड जाते!
कबूल करता-करता कविता सुचते...

सततच बोलत असतो मी माझ्याशी
स्वतःत रमता-रमता कविता सुचते...

No comments:

Post a Comment

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express