Wednesday, 24 January, 2007

अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

आयुष्य असंच जगायचं असतं!

जे घडेल ते सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

कुठून सुरू झालं हे माहीत नसलं,
तरी कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

कुणासाठी काहीतरी निस्वार्थीपणे करायचं असतं,
स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखावायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

दु:ख आणि अश्रूंना मनांत कोंडून ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं मात्र असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

पंखांमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी,
'मागून मागून काय मागितलंस', असंच म्हणायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

Friday, 12 January, 2007

मराठी मुलगी

company मधे अनेक mod मुली असतात,

पण जी गोड लाजते,

ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली short top घालतात.

पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,

ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली jeans घलुन येतात,

पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,

ती मुलगी मराठी असते.

कंपनीमधे अनेक मुली असतात

पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते

ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात

स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते

ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात

खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते

ती मुलगी मराठी असते

आकर्षण

आकर्षण आणि प्रेम..

यात एक रेघ असते..

पुसट की ठळक ...

ती आपण मारायची असते..

प्रेमाकडे जाणारा रस्ता

आकर्षणाच्या बोगद्यातून

जात ही असेल...

पण त्या गहि-या मोहजालात

तुला तुझा मार्ग खरच का गवसेल??

आकर्षणाला प्रेम समजून

आपण उगीच वाहून जातो..

पण. थोड्याच दिवसान्नी कळत...

खरतर अस काहीच नव्हत.

.म्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..

पण तो तर फ़क्त एक आभास असतो...

Thursday, 11 January, 2007

अशक्य काहीच नाही

जेंव्हा तुमची नजर

प्रथम एका नजरेशी भिडते

लक्ष केवळ इकडेच द्या

काय तुमचे ह्रदय बोलते.

या दुनियेबाहेर अनुभवा

एक वेगळीच दुनिया

लक्षात ठेवा पहिल्या प्रेमाचीच

आहे ही किमया.

होऊन जा बेचैन

केवळ तिला पाहण्यास

हळूच घ्या मिठित

ती स्वप्नात आल्यास.

आठवनींत तिच्या

होऊन जा बेधुंद

श्वासात तुमच्या दरवळू द्या

केवळ तिचाच सुगंध.

भेटून एकदा तिला

सांगा जे मनात आहे ते,


अशक्य काहीच नाही.

ओठांवर आलेले शब्द

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

मी बोलतच नाही

डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....

तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...

स्तब्ध होऊन

तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...

क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं

पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो

बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही

बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं

सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही

माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं

तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?

तिच्याही एखाद्या पुस्तकात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील ...

पाऊस

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी
सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी
सदा सुख दु:खात साथदेणारी

एक प्रवास

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा

Monday, 8 January, 2007

एकदा

एकदा मला भेटायला
माझ्या घरी येशील
आणि केस मोकळे सोडून
माझ्या जवळ बसशील

मी दोन्ही हातांमधे
तुझा चेहरा घेईन
रेखीव गहिऱ्या डोळ्यांमधे
बघून हरवून जाईन

तू विचार माझा राज़ा
असं काय बघतो?
मी म्हणेन बघतो कुठे?
पावसात भिजतो

मग तू अलगद, तुझा रेखीव
पापण्या मिटून घेशील
पाऊस ओसरल्यावरचं
निरभ्र आकाश होशील

मग विचार किती वाजले?
वेळ झाली का?
मी म्हणेन हे ग काय राणी
मग तू आलीसच का?

मला जवळ घेऊन
माझी समजून घाल
म्हण राजा सोडून जाताना
माझेही होतात हाल

मग मी तुला पुन्हा एकदा
डोळ्यात साठवून घेईन
आणि एकदम शहाण्यासारखा
तुला जाऊ देईन

वेड बनून जगण्यात खरी मजा आहे

शहाणं बनून शहाण्या सारखं सगळेच जगत असतात

सुख दुःखाला आपल्या ते व्यवहारानं भागत असतात

व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे

कुणासाठी तरी अस वेड बनून जगण्यात खरी मजा आहे

वर्षाकाळी आकाशात काळे मेघ जमणारच

वृष्टीतून सृष्टी माया आपल्यावर करणारच

पाऊस पडू लागला की शहाणी माणसं शिंकू लागतात

छत्री आणि रेनकोटच महत्त्व ते घोकू लागतात

एक वेडा गिरक्या घेत तेव्हा पावसात भिजत असतो

येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हणत असतो

पैशाच मोल शहाण्या इतकं कुणालाच कळत नसत

पण एक पैसा देऊन पाऊस घेणं त्यांना वळत नसत

व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे

कुणासाठी तरी असं वेडं बनून जगण्यात खरी मजा आहे

वसंत आपल्या कुंचल्यानं सारी सृष्टी रंगवू लागतो

जीवन गाणं कोकीळ कुहु कुहु गाऊ लागतो

गाणं म्हणल की शहाणा माणूस सरसावणारच

कुठला राग कुठली बंदिश सांगून तुम्हाला घाबरवणारच

एक वेडा तेव्हा आपल्याच नादात गात असतो

आपल्याच तालात आपल्याच सुरात न्हात असतो

गाण्याचा कायदा शहाण्या इतका कुणालाच कळत नाही

पण बेधुंद होऊन गाण्याचा फायदा मात्र त्याला वळत नाही

व्यवहार हा विसरून सारा गाणं गाण्यात खरी मजा आहे

कुणासाठी तरी अस वेड बनून जगण्यात खरी मजा आहे

बस स्टॉपवरची मुलगी

एकदा ती बसमध्ये अचानक दिसली
मित्राने ओळख करून दिली
मी विचारले , कोणत्या शाळेतली गं तू?
तुझ्याच शाळेतली , बघितलं नाही कधी मला तू?

काय सांगणार आता हिला
एकदा वर्गातल्या मुलीला हाच प्रश्न विचारला
चिडली होती जरा, "तू मुलींकडे कधी बघतच नाहीस"
काय करणार, तेव्हढी हिंमतच झाली नाही

हा, तर ती बस मधली मुलगी
आताही माझ्याच कॉलेजात होती
सुंदर ती होती, वाणीही मंजुळ होती
राज की बात, मला ती आवडली होती.

मग काय माझा बसस्टॉपला जायचा टाइम बदलला
वाट पाहण्यात एक-दोन बसही चुकू लागल्या
दूरून दिसताच ती, गोड गुदगुल्या होऊ लागल्या
देवकृपा, असा योगायोग वारंवार घडू लागला

बघता बघता दोन वर्षे अशीच सरली
तरीही स्टॉपपुढे माझी मजल नाही गेली
कॉलेज संपले, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या
कोमल हृदयात माझ्या, हाय! , आठवणी मात्र राहिल्या

जेथे बसून मी खूप काही स्वप्ने रंगवली होती
तो स्टॉप आता खाली खाली वाटत होता
गेला उन्हाळा , गेला पावसाळा , हिवाळा ही गेला
तिच्या दर्शनासाठी हा मन्या पार तरसून गेला

पुन्हा योगायोग, त्याच बसस्टॉपवर ती अचानक दिसली
हसलो मी, सुखावलो मी आणि पुन्हा तिच गुदगुली
नजरा नजर होताच मोठ्या खुशीत मी विचारले
काय! खूप दिवसांनी भेट झाली ना आपली!!

तिच्या त्या प्रश्नार्थक नजरा, गोंधळलेला चेहरा
काय झालं ! असा कोणता बॉम्बं मी टाकला
विचार केला तिने, त्याच मंजुळ वाणीत ती वदली
"माफी, चेहरा ओळखीचा वाटतो, पण नाव काय आपलं?"

क्षणात कोसळलो आकाशातून खाली, आई गं!!
चांदणे चमकले, थोडी भोवळही आली
लाचार उभा मी, माझ्यावरच ही वेळ का आली
नाव सांगितलं मी, "बघ आठवतं का काही"

हसली जरा ती, कदाचित चूक तिला कळली
पण लगेचच पुढच्या बसने "टाटा" म्हणून निघून गेली
बसच्या घंटीने माझी सारी स्वप्ने मोडली
अशी ती मुलगी माझी फजिती करून गेली

साधा भोळा मी, बिचारा, तुटलो होतो जरा मी
पण सावरलोय मी, ठरवलं आहे पक्कं मी
कानाला खडा, कोणासाठी अधीर इतका होणार नाही मी
झालोच तर, बसस्टॉपवर वाट मुळीच पाहणार नाही मी.....

काहीच कळत नाही

बोलावं वाटतं खूप पण... जीभच वळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मन झालंय वादळवारं.. तूफान मनात दाटलंय सारं


आवेगाचा पाऊस जसा... कोसळत जातो धुवाधार

बरसावं वाटतं तसंच पण... शब्दच फळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

स्वतःशीच हसणं होतं... स्वतःशीच बोलणं होतं

कुणी काही म्हटलं तरी... मन मुकं मुकं होतं

ज्यांच्यावाचून नव्हतं करमत.. त्यांच्याशीही जुळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

तुझीच आस, तुझीच ओढ... काहीच नाही वाटत

गोडकानी गुंजते तुझीच शीळ... जीव तुटतो तीळ तीळ

छळायचा जो एकांत आता.. तो ही छळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मुकी मुकी जरी वाणी... मनी मात्र फुलती गाणी

आटपाट नामे नगरीचा.. तू राजा, मी राणी

सारं तसं खोटं खोटंच... पण मनास वळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मागू नकोस

मागू नकोस रे तू

आपण जगलेले ते बेभान क्षण

जरा कुरवाळू दे ना मला

ती विलक्षण आठवण

धुंद पावसातली ती

ओली गच्च संध्याकाळ

एकाच छत्रीतून केलेलीती नशीली वाटचाल

त्या मुसळधार पावसाच्याबेफाम सरी

अन तुझ्या सहवासाचीती गोड शिरशिरी

सारं कसं भारलेलंमंत्रमुग्ध झालेलं

मौनानंच जणूसारं काही बोललेलं

माझ्या मनात कायमचासाठवू दे रे

तुलादृष्टीआड होण्या आधी

सारं पुन्हा जगू दे रे मला

एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर

काळ्या ठक्कर अंधारातून आली तेजस्वी किनार
नजरेतुन नजर झाली आरपार

हजारो लाखो असतील तुझ्या मागे पुढे
कदाचित तुझ्या लेखी असो आम्ही त्यातलेच एक बाजीराव फाकडे

खऱ्या खोट्या प्रेमाची जाण फक्त तुलाच आहे..
म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही म्हणणारा हा पठठया तुझ्यापुढे नमायला तयार आहे

माहितेय ...माहितेय... सगळचं आपल्या मनासारखं घडावं असं नसतं काही
पण भावना पोचल्या तुझ्यापर्यंत आणि एक स्मितहास्य आलं....

तर समजेन एका क्षणापुरतं तरी माझ्या प्रेमाला दाद दिली.. !!!
आणि मी यातचं सारं आयुष्य सामावून बसेल....

त्या एका क्षणाला मी ब्रम्हदेवाचा क्षण समजतो..
कारण त्यामुळेच सात जन्म मी तुझं प्रेम मिळवू शकतो

म्हणूनच एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर

प्रिया

नकळत उमले हसू ओठावर

मनी तिचा तो अल्लड वावर

आठवणींची भरली ओंजळ

अंतरातूनी पसरे दरवळ

रंग केतकी, जिवणी नाजूक

गालांवरचे गुलाब मोहक

महिरप कुरळ्या केसांची

अन्भाळावरची बट ती कामुक

भाव मनीचे नेत्र सांगती

शब्दाविण ते बोलून जाती

तार दिलाची छेडून जाती

संमोहन ते पसरुन जाती

सौंदर्यखणी ती, मदनमंजिरी

वेड लाविते नजर लाजरी

उत्कट खुलते प्रीत बावरी

माझी प्रिया ही गोड गोजिरी

Sunday, 7 January, 2007

उचकी

जेव्हा उचकी लागते तेव्हा

कोणीतरी आपलं माणूस म्हणे

आपली आठवण काढत असते

हे खरं की खोटं, देव जाणे...

एक मात्र नक्कीच खरं

मला उचकी लागते तेव्हा

आठवण फक्त तुझीच येत असते...


मैत्रिणीचं लग्न

वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं

म्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो

चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला

नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण

दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण

मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं

विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?

Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी

प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली

हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली

प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते

कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,

ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते.

प्रेम कुठेही कराव.

प्रेम कुठेही कराव.

प्रेम शाळेत कराव.

प्रेम कॉलेजात कराव.

प्रेम वर्गात कराव.

वाटेत जात जात कराव

प्रेम बागेत कराव.

घोड्यान्च्या पागेत कराव.

प्रेम पवित्र असते तेव्हा ते

देवळच्या रान्गेतही कराव

रिकामी मिळाल्यास कुठ्ल्याही जागेत कराव

प्रेम कुठेही कराव

प्रेम समुद्राकाठी कराव

प्रेम खडकापाठी कराव

फ़ुटणाऱ्या लाटान्ना साक्शी ठेवुन

फ़क्त परस्परान्साठी कराव

प्रेम नावेत कराव

प्रेम हवेत कराव

आणि महत्वाचे म्हणजे परस्परान्च्या कवेत कराव

प्रेम कुठेही कराव

बसस्टॅन्ड वर करु देत नसतील तर

एस टी स्टॅन्ड वर कराव

एस टी येईपर्यन्त कराव

प्रेम करण्याजोग बाजुला कोणी बसल

तर एसटीतही कराव

प्रेम माडीत कराव

काळ्या काचान्च्या गाडीत कराव

शेजारीच प्रीती मिळत असेल तर

आपल्या वाडीतही कराव

प्रेम कुठेही कराव

प्रेम नैसर्गिक असत

म्हणुन ते झाडाखाली कराव

प्रेम शोर्यशाली असत

म्हणुन ते गडाखाली कराव

प्रेम कुठेही कराव पण

आजुबाजुला रोखलेले डोले आहेत

त्यात भीड आहे थोडीशी चीडही आहे

याच भान ठेवुन कराव

एरवी प्रेम कुठेही कराव

प्रेम कुठेही कराव

Friday, 5 January, 2007

गुन्हा

म्हणून मी स्वतःला
कामाच्या ढिगात गाडतो
तुझ्या आठवणींच्या भुतांना
दूरदेशी धाडतो

चुकून आज चूक झाली
विसर पडला या गोष्टीचा
भरल्या जखमेतल्या रक्तालाही
मोका मिळाला बंडखॊरीचा

कोमेजल्या फुलांनाही
मंद गंध दरवळतोय
दिवससुद्धा आज दुष्टपणे
रात्रीला हुलकावतोय

उष्ण उन्हाळी वारेसुद्धा
श्वास तुझाच घेउन आलेत
आज पुन्हा तेव्हासारखे
सगळे तुलाच सामील झालेत

का मला तू एकटयाला
स्वस्थ बसू देत नाहीस?
माझ्या एकटेपणालाही
एकटे म्हणून सोडत नाहीस?

विसरून गेलीस तू होते काही
थोडे फार जे काही
आठवणींच्या तुरुंगात
खुशाल मला टाकून देई

सुटकाही होत नाही
शिक्षाही संपत नाही
का कधी न केल्या गुन्ह्याला
कसलीच क्षमा नाही?

प्रेम म्हणजे काय...

प्रेम म्हणजे काय...

मनाला उल्हसित करून टाकणारी

हवेची मंद झुळूक....

हृदयाला सुखावणारी एक भावना......

प्रेम म्हणजे मनांचा संगम....

एकमेकांबदद्लची आत्मीयता...

आयुष्यात कोणीतरी पाहिजे ,

प्रत्येक वळणावर साथ द्यायला...

"वो सिकंदर ही दोस्तों कहलता है,

हारी बाजी को जितना जिसे आता है..."

असे म्हणत आपल्याबरोबर असणारे

कोणीतरी हवे......

कधी आई-वडील, कधी भाऊ-बहीण

तर कधी मित्र-मैत्रीण...

कोणी-ना-कोणी असतेच आपल्याला साद देणारे

फक्त गरज आहे हाकेला 'ओ' देण्याची......!

Thursday, 4 January, 2007

माझ्या प्रेमाबद्दल,

आज खूप लिहावसं वाटतय मझ्या प्रेमाबद्दल,

मी शाळेत असतानापासून एका मुलीच्या प्रेमात होतो. ती आमच्या शेजारीच यायची, म्हणजे तिची मामी आमच्या शेजारी राहायची. लहानपणीच आम्ही एकत्र खेळायचो. एकत्र खेळताना तिच्या बद्दल आणखी महिती कळायला लागली तेव्हा पासून मला तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. मी जराही वेळ न घालवता तिला सांगितलं. भले मझ्या सांगण्याची पद्धत चूकली असेल पण मझ्या भावना तर बदलत नहित ना.

तिने अपेक्षीत उत्तर दिलं की आपण तर एकमेकांना चांगलं ओलखत पण नही तर तु असा विचार कसा करू शकतोस. अता मला अस वाटत नही की प्रेमात पडायला ओळखीची गरज असते ते. मी काय वेडा म्हणून तिला हे सगळं सांगत नव्ह्तो. पण जाउदे तिचं पण बरोबर असेल. नंतर बरेच दिवस गेले, आमच आयुष्य असच चाललं होतं. मी माझ्या भावना माझ्या मनातच ठेवल्या.

तीला माझ्या बद्दल कहीच वाटत नही हे सुद्धा मला मान्य आहे. पण एवढीच इच्छा आहे की तिनी पण माझ्या भावना समजून घेतल्या पहिजेत. मी तिला असं कधीच म्हंटल नव्हत की तु आख्ख आयुष्य माझ्या बरोबर घालव. मझं फक्त एवढच म्हणन आहे की तिनी मझ्याशी बोलावं ती आनंदी राहिल त्यातच माझं सूख आहे. एवढी वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखत आहोत पण अजुनही तिला माझ्या भावना समजल्या नाहीत. मध्यंतरी माझ्या कडून काही चूका झाल्या असतील पण म्हणून माझ प्रेम कधिच कमी झालं नाही.

आता मला सगळं विसरायचय परत नविन सुरुवात करायची आहे.

मझ्या एका मैत्रिणीने सांगितल आहे कि जो माणुस भुतकाळात असतो त्याला भविष्यकाळ नसतो.


Abhijeet

Abhijeet
Looking forward to express