Wednesday, 29 July, 2009

बऱ्याच दिवसांनी काहीतरी

मध्ये खूप दिवस झाले काही लिहिलं नव्हत म्हणून आज वेळ आहे तर लिहित आहे
गेल्या आठवड्यात श्री राज ठाकरे यांच्या म.न .से. कार्यकर्त्यांचा एक अजब प्रकार नजरेत पडला
आता तो माणूस म.न.से चा कार्यकर्ता होता का नाही ते माहित नाही पण मला जे खटकल ते लिहित आहे

मी गेल्या आठवड्यात मुंबई सेन्ट्रल पासून taxi पकडली दादर ला यायला आणि सेना भवन पाशी signal ला एक motor cycle वाला आमच्या मध्ये आला
आमच्या taxi driver ची काहीच चूक नव्हती तो बरोबर signal ला थांबला होता . तो motor cycle वाला आम्हाला उगाचच शिव्या द्यायला लागला कि सिग्नल ला लाने तोडून कशाला येत वगैरे
खरा सांगायचा तर आमचा taxi driver बरोबर जात होता आणि त्या दुसर्या माणसानेच पहिल्यांदा शिव्या द्यायला सुरुवात केली .
नंतर पुढच्या सिग्नल ला तो गाडी बाजूला लावून taxi driver चा गळा पकडायला आला आणि म्हणाला

"तुझ्या आईच्या तर ..... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला शिव्या देतोस ........ चल बाहेर ये "

आता खरा तर तोच शिव्या देत होता आणि आम्हाला म्हणत होता कि शिव्या देऊ नकोस करून
माझा तर मत पडत कि तो कार्यकर्ताच नसावा कारण मी स्वतः राज ठाकरे यांचा fan आहे आणि त्यांनी अश्या माणसांना थारा देलेला नाही
मग दुसरी माणस अस करून म.न.से. च नाव कशाला खराब करतात काही समजत नाही .

जाऊदे.
नंतर परत वेळ मिळाला कि परत काहीतरी नवीन लिहीन

No comments:

Post a Comment

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express