Monday, 8 January, 2007

प्रिया

नकळत उमले हसू ओठावर

मनी तिचा तो अल्लड वावर

आठवणींची भरली ओंजळ

अंतरातूनी पसरे दरवळ

रंग केतकी, जिवणी नाजूक

गालांवरचे गुलाब मोहक

महिरप कुरळ्या केसांची

अन्भाळावरची बट ती कामुक

भाव मनीचे नेत्र सांगती

शब्दाविण ते बोलून जाती

तार दिलाची छेडून जाती

संमोहन ते पसरुन जाती

सौंदर्यखणी ती, मदनमंजिरी

वेड लाविते नजर लाजरी

उत्कट खुलते प्रीत बावरी

माझी प्रिया ही गोड गोजिरी

2 comments:

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express