Thursday 8 November, 2007

सखी स्वस्त झाल्या खारका...

सखी स्वस्त झाल्या खारका, आता तरी घेशील का?

साखरी खारीक देखणी, वाटली जरी थोडी जूनी
हा लॉट अंतीम राहिला, त्यास योग्य किम्मत देशील का?

तागड्यात आहे वजनही अनं खिशात सुट्टे पैसे ही
हा सुकामेवा खाणारा, ग्राहक तू होशील का?

जे जे हवे होते किचनी, आहे ते सारे लाभले
या खारका बरणीत भरूनी, किचन ला शोभा देशील का?

बोलाविल्यावाचूनी विक्रेता हा, आलो मी दारी तुझ्या
थांबेन इथे काही प्रहर पण सांग तू नक्की घेशील का?

सखी स्वस्त झाल्या खारका, आता तरी घेशील का?


No comments:

Post a Comment

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express